68 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे, आता रतन टाटा सांभाळणार धुरा; सरकारने केले शिक्कामोर्तब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत मोठी बातमी येत आहे. कर्जबाजारी एअर इंडियाला विकण्याचा सरकारचा प्रयत्न अखेर यशस्वी झाला. या विमान कंपनीला अनेक वर्षानंतर अखेर नवीन मालक मिळाला आहे. सरकारने एअर इंडियाच्या बोलीच्या विजेत्याची घोषणा केली. एअर इंडियाचे नेतृत्व आता टाटा ग्रुप करणार आहे. Department of Investment and Public Asset Management (DIPAM) ने एक पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. DIPAM सचिव आणि सिविल एविएशन मिनिस्ट्रीचे सचिव एअर इंडियाच्या बोलीसंदर्भात पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम (AISAM) पॅनलने एअर इंडियाच्या आर्थिक बोलीवर निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी या पॅनलमध्ये समाविष्ट आहेत. DIPAM चे सचिव तुहिनकांत पांडे म्हणाले की,”अनेक वेळा बोलीसाठी अर्ज मागवण्यात आले होते, मात्र शेवटी सप्टेंबरमध्ये दोन बोलीदारांची नावे निश्चित करण्यात आली. एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जाईल. त्याचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.”

टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटचे अजय सिंह यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती. अलीकडेच ब्लूमबर्गने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा ग्रुपची निवड केली आहे. डिसेंबर पर्यंत टाटाला एअर इंडियाची मालकी मिळू शकते. जेआरडी टाटांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. आता 68 वर्षांनंतर टाटा ग्रुपने सर्वाधिक बोली लावून एअर इंडिया परत खरेदी केली आहे.

सरकार एअर इंडिया का विकत आहे?
त्याची कथा 2007 पासून सुरू होते. 2007 मध्ये सरकारने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे विलीनीकरण केले. या विलीनीकरणा मागे सरकारने इंधनाच्या वाढत्या किंमती, खासगी विमान कंपन्यांकडून स्पर्धा हे कारण सांगितले होते. एअर इंडिया वर्ष 2000 ते 2006 पर्यंत नफा कमवत होती, मात्र विलीनीकरणानंतर त्रास वाढला. कंपनीवरील कर्ज वाढतच गेले. 31 मार्च 2019 पर्यंत कंपनीवर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज होते. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी विमान कंपनीला 9 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो असा अंदाज होता.

वर्षानुवर्षे चालत असलेल्या कंपनीला विकण्याचा प्रयत्न
यापूर्वी 2018 मध्ये देखील सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची तयारी केली होती. त्यावेळी सरकारने एअर इंडियामधील 76 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) मागवण्यात आले, त्यासाठीच्या सबमिशनची शेवटची तारीख 31 मार्च 2018 होती, मात्र निर्धारित तारखेपर्यंत एकाही कंपनीने सरकारकडे EoI सादर केले नव्हते. यानंतर, प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये नव्याने सुरू करण्यात आली. यावेळी 76 टक्क्यांऐवजी 100 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यासाठी कंपन्यांना 17 मार्च 2020 पर्यंत एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करण्यास सांगितले गेले होते, मात्र कोरोनामुळे विमान उद्योगाला मोठा फटका बसला, यामुळे तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आणि शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 ठेवण्यात आली.

एअर इंडियाची सुरुवात टाटांनी 1932 मध्ये केली होती
एअर इंडियाची सुरुवात टाटा ग्रुपने 1932 मध्ये केली होती. टाटा ग्रुपचे जेआरडी टाटा हे त्याचे संस्थापक होते. ते स्वतः पायलट होते. त्यावेळी त्याला टाटा एअर सर्विस असे नाव देण्यात आले. 1938 पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ती एक सरकारी कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर सरकारने त्यात 49% हिस्सा विकत घेतला.

Leave a Comment