Sunday, February 5, 2023

मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवले प्रेमात; शेवटी सत्य समोर आले अन्…

- Advertisement -

लंडन : वृत्तसंस्था – लंडनमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. यामध्ये एका मुलीने मुलगा बनून दुसऱ्या मुलीशी मैत्री करून तिच्याशी दहा वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा मुलीला समजले कि तिच्याशी संबंध ठेवत असलेला बॉयफ्रेंड मुलगा नसून मुलगीच आहे, तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला. यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्याबाबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर त्या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या तरुणीला ताब्यात घेतले.

काय आहे नेमके प्रकरण
न्यूलैंड नावाच्या 25 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर मुलाच्या नावाने बनावट फेक अकाऊंट तयार केले. यानंतर न्यूलैंडची फेसबुक अकाऊंटवर एका तरुण मुलीशी मैत्री झाली होती. न्यूलैंड तिच्याबरोबर फक्त एक मुलगा म्हणून फेसबुकवर बोलत होती. तसेच न्यूलैंड तिला भेटतानासुद्धा मुलगा बनूनच भेटत होती. या नंतर त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

जेव्हा घरी कोणी नसते तेव्हा या दोघी शारीरिक संबंध ठेवत असत. परंतु तोपर्यंत पीडित तरुणीला समजले देखील नव्हते कि न्यूलैंड देखील एक मुलगी आहे. न्यूलैंड त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवताना सेक्स टॉयचा वापर करत होती अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. न्यूलैंडने पीडित तरुणीसोबत आतापर्यंत 10 वेळा शारीरिक संबंध ठेवले आहेत. पण जेव्हा पीडित मुलीला न्यूलैंडबद्दल खरं सत्य समजलं तेव्हा तिने पोलीस ठाण्यात जाऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर कोर्टाने न्यूलैंडला 8 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.