लग्नाची मागणी जीवावर बेतली; तरुणानं प्रेयसीला लॉजवर बोलावले अन्…

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील तुर्भे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लग्नाची मागणी केल्याच्या कारणातून येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाळण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपी प्रियकराला अटक केली. तसेच बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता.

काय आहे नेमके प्रकरण ?
घटनेच्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी संबंधित प्रेमीयुगुलाने मुंबईतील तुर्भे परिसरातील साई प्रणव लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. यावेळी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या दोघांच्या भांडणाचा आवाज रूमच्या बाहेर येत होता. त्यामुळे हॉटेलच्या स्टाफने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता, तरुणी बेशुद्धावस्थेत आढळली. यानंतर पोलिसांनी तिला तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याअगोदरच तिचा मृत्यू झाला होता.

यादरम्यान मृत तरुणीसोबत असलेला तरुण पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपणच गळा आवळून तिची हत्या केल्याचं आरोपी प्रियकराने पोलिसांसमोर कबुल केले. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एपीएमसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या कारणामुळे केला खून
आरोपी तरुण हा खडकपाडा कल्याण येथील रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून आरोपीचे आणि मृत तरुणाचे प्रेमसंबंध होते. यामुळे काही दिवसांपासून मृत तरुणीने लग्नासाठी तगादा लावला होता. पण आरोपीला लग्न करायचे नव्हते. घटनेच्या दिवशी लॉजमध्ये देखील याच कारणामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि आरोपीने गळा आवळून प्रेयसीचा खून केला.