Wednesday, October 5, 2022

Buy now

सीएच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सनदी लेखापालच्या म्हणजेच सीएच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हि धक्कादायक घटना केशवनगर परिसरात घडली आहे. पल्लवी संजय जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने एवढा टोकाचा निर्णय घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पल्लवीने परीक्षेतील अपयशामुळे एवढा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मृत पल्लवी सनदी लेखापाल म्हणजेच सीएच्या अभ्यासाची तयारी करत होती. यापूर्वीही तिने दोनवेळा सीएची परीक्षा दिली होती. मात्र त्यामध्ये तिला अपयश आले होते. यावेळी तिने तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली मात्र यामध्ये देखील तिला अपयश आले.

या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मृत पल्लवी घरात कोणाशीच बोलत नव्हती. यानंतर आज सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पल्लवी पुन्हा परीक्षेत अपयशी ठरल्याने तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे पल्लवीच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.