Thursday, October 6, 2022

Buy now

माणुसकीला काळीमा ! खुन करून गळ्याला दोरी बांधून मृतदेह नेला फरफटत

बीड – महिलेचा दगडाने ठेचून खून केल्यानंतर गळ्यात दोरी बांधून मृतदेह शंभर फुटांपर्यंत फरपटत नेला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा थरार शुक्रवारी मध्यरात्री जिल्ह्यातील केज तालुक्यातील हंगेवाडी घडला. या खुनातील आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. सखुबाई बन्सी शिंदे (60, रा. हंगेवाडी, ता. केज) असे मयत महिलेचे नाव आहे.

हंगेवाडी शिवारातील गायरानात काही पारधी कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील सखुबाई शिंदे यांचा दगडाने छिन्नविच्छिन्न केलेला मृतदेह काल सकाळच्या सुमारास आढळून आला. त्यांच्या गळ्यात दोरी आढळली शिवाय घटनास्थळी शंभर फुटांपर्यंत त्यांना फरपटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या. यावरून त्यांची हत्या किती निर्घुणपणे झाली असेल, याचा अंदाज येईल. काल हा मृतदेह आढळला वरेकेज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत, केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, उपनिरीक्षक दादासाहेब सिद्ध यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह नांदुरघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी काल रात्री उशिरापर्यंत केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होणे सुरू होते.