इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर शेतात दोघांची भेट अन् बलात्काराचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर युवक- युवतीची ओळख झाली, पुढे लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केला. अखेर युवती 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर बलात्कार करून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नास नकार दिल्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबधित युवतीने फिर्याद दिली. शुभम भालेराव (मूळ रा. निगडी अंगापूर, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी 21 वर्षीय सातारा तालुक्यातील एका गावातील युवतीने तक्रार दिली आहे. तक्रारदार युवतीची संशयित युवकासोबत काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली. यातून संशयिताने युवतीचा मोबाईल नंबर घेतल्यावर संशयिताने लग्नाची मागणी घातली.

पुढे दोघे एकमेकांना भेटल्यानंतर तक्रारदार युवतीच्या इच्छेविरुध्द युवकाने म्हसवे गावच्या हद्दीत एका शेतात बलात्कार केला. या घटनेने ती युवती गरोदर राहिली. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर संशयिताने सुरुवातीला थांबण्यास सांगितले. मात्र संशयित टाळाटाळ करु लागल्याने फसवणूक झाल्याने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली. युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.