धक्कादायक ! मोबाइलमधील गाणी ऐकत 22 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जालंधर : वृत्तसंस्था – जालंधरमधील माडल हाऊस येथील एका 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. जेव्हा मृत तरुणीचा भाऊ तिला जेवण देण्यासाठी तिच्या खोलीत गेला असता हि धक्कादायक घटना समोर आली. बराच वेळ बहीण दार उघडत नसल्यामुळे शेवटी घरातील सदस्यांनी खोलीचं दार असता तरुणीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.मृत तरुणीच्या वडिलांचे पान-बिडीचं छोटंस दुकान आहे. बऱ्याच दिवसांपासून तरुणी तिच्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा हट्ट करीत होती.

मात्र पैशांअभावी वडिलांनी जाता येणार नाही असे सांगितले. यामुळे नाराज झालेली तरुणी आपल्या खोलीत गेली आणि मोबाईलवर गाणी लावून तिने दुपट्ट्याने पंख्याला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे.

You might also like