सुशांतच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला अन्….; राणेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूतचे जेव्हा निधन झाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून तुम्ही याविषयी काही बोलू नका अशी विनंती केली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांना मालवण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नारायण राणे म्हणाले, सुशांतच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दोन वेळा फोन केला अन् ते म्हणाले की आपण सुशांत आणि दिशाच्या याप्रकरणी तुम्ही काहीही बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती अस बोलू नका. तुम्हालाही मुले आहेत. मात्र पोलिसांनी माझ्या स्टेटमेंट मधून हे वगळले आहे असे राणेंनी म्हंटल.

दरम्यान, मी आणि नितेश काय बोललो, तिची आत्महत्या नाही हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना तक्रार करायला भाग पाडलं. आमची बदनामी होतेय. अशी तक्रार केली. खोटी तक्रार केली. मात्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहणार. आम्ही आवाज उठवणार. दिशा सॅलियची केस क्लोज केली जातीय. ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना संरक्षण दिले जातंय असा आरोप नारायण राणे यांनी केला.