ऊस हंगामाच्या तोंडावर कारखान्यांचे गाळप परवाने पेंडिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रलंबित ‘एफआरपी’ तसेच सरकारी देणी देण्यास विलंब या कारणांसहित साखर आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर विभागातील १८ कारखान्यांचे गाळप परवाने आज अखेर पेंडिंग ठेवले आहेत. साखर हंगाम तोंडावर असताना परवाने पेंडिंग ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेंडिंग ठेवलेल्या कारखान्यांना १३ नोव्हेंबरला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे.

पेंडिंग ठेवलेल्या साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील केन ॲग्रो, शरद नरंदे, उदयसिंह गायकवाड बांबवडे, रिलायबल शुगर फराळे, सदाशिवराव मंडलिक ,आप्पासाहेब नलवडे, दौलत हलकर्णी, पंचगंगा इचलकरंजी ,कुंभी कासारी कुडित्रे, वारणा, आजरा या कारखान्यांचा समावेश आहे. तर पेंडिंग ठेवलेल्या साखर कारखान्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील राजारामबापू कारंदवाडी, सोनहिरा ,वांगी महाकाली, यशवंत शुगर , मानगंगा ,तासगाव, राजारामबापू जत या कारखान्यांचा समावेश आहे.

दरम्यान महापूर आणि परतीच्या पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यामध्ये यंदा उसाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सरकार स्थापनेला झालेला उशीर यामुळे ऊस हंगाम सुरु होण्यासाठी लागलेला वेळ यामुळे शेतकरी आधीच चिंतातुर झालेला आहे. मात्र जेवढा केवढा शिल्लक आणि सुस्थितीमध्ये असलेला ऊस शेतकऱ्याने कसातरी जगवला आहे. असे असताना कारखान्यांचे हंगामाचे परवाने पेंडिंग ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment