खुशखबर! राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना थकबाकीदार असूनही मिळणार नवं कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने त्यांना नवं कर्ज मिळणं अवघड झालं आहे. अशावेळी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत या थकीतदार ११.१२ लाख शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी नवं कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने बँकांना दिल्या आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना देखील खरीपाचे नवं कर्ज मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. यांच्या थकीत कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. या शेतकर्‍यांच्या कर्जाची थकीत रक्कम राज्य सरकारच्या नावे करून शेतकऱ्यांना नवं कर्ज देण्याचा यामध्य स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यातील ८१०० कोटी रुपये राज्य सरकार व्याजासह बँकांना देणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. राज्यातील ३२ लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत. मात्र निधी अभावी ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती. या खातेदारांना ८१०० कोटी लाभ देणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आता सरकारने दिलासा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment