शेतकर्‍यांसाठी फायद्याची गोष्ट! देशातील साखर जाणार युरोपला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन युनियनला (ईयू) साखर निर्याती करण्यास सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. ईयूला साखर निर्यात करण्यासाठी सरकारने 10 हजार टन इतका कोटा निश्चित केला आहे. हा कोटा 1 ऑक्टोबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच, या काळातच साखर निर्यात केली जाईल. युरोपियन युनियनला रॉ किंवा व्हाइट शुगर म्हणून निर्यात केली जाऊ शकते. यासाठी सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार असे सांगितले गेले आहे की जी निर्यात सुचवली गेली आहे ती 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होऊ शकते आणि आपण 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतच निर्यात करू शकतो. ही एक दिलासा देणारी बातमी म्हणता येईल कारण साखर कारखान्यांकडे बरीच सरप्लस साखर आहे आणि या साखर सरप्लसमुळे साखर कंपन्या निर्यातीची मागणी करत आहेत.

 

निर्यातीचा कोटा व निर्यातीची सब्सिडीच्या अंतर्गत निर्यातीसाठी किती साखर मंजूर करावी लागेल, अशी साखर कंपन्यांची उर्वरीत मागणी सरकारच्या विचाराधीन आहे. यापूर्वीही सरकार साखर निर्यात व निर्यातीसाठी सब्सिडी मंजूर करत होते. सध्या ही दिलासा देणारी बाब आहे की सरकारने साखर
कंपन्यांना ईयूकडे साखर निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.

शुगर शेअर्स वाढले
युरोपियन युनियनकडून साखरेच्याच्या निर्यातीस सूट मिळाल्याच्या वृत्तामुळे शेअर बाजारातील साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली. धामपुर शुगर, बलरामपुर शुगर त्रिवेणी इंजीनियरिंग, उगर शुगर, डामिया भारतच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment