कोल्ह्याने सिंहाची शेपूट खेचली आणि…पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. बऱ्याचदा काही मजेशीर व्हिडीओ शेअर केले जात असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो बऱ्यापैकी व्हायरल होतो आहे. या व्हिडिओची गंमत म्हणजे एक कोल्हा चक्क जंगलाच्या राजाची शेपूट खेचतो आहे. तसा हा व्हिडीओ पाहणाऱ्याला खूपच मजेशीर वाटतो. ओडिसामध्ये नोकरीत असणारे आयएफएस अधिकारी सुसंथ नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सुसंथ नंदा हे आपल्या ट्विटर अकॉउंटवरून प्राण्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. आणि हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकांना आवडतात देखील त्यांनी मागे एकदा कोब्राच्या हेडबाथचा व्हिडिओ शेअर केला होता. तोही चांगलाच व्हायरल झाला होता. जंगलाचा राजा सिंह याची चेष्टा करण्याची तर कोणी हिंमतही करु शकत नाही. कारण सिंहाची चेष्टा करणं म्हणजे मृत्यूला बोलावणं हे सर्वच प्राण्यांना समजतं. पण या व्हिडीओ मध्ये एक खोडकर कोल्हा झोपलेल्या सिंहाची चक्क शेपूट खेचताना दिसतोय. शेपूट खेचून सिंह जागा झाल्यावर हा पटकन तिथून पळून जातो आहे.

हा व्हिडिओ तसा जुना आहे. पण तो आता पुन्हा नव्याने व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये जंगलात एका झाडाखाली सिंह आराम करताना दिसत आहे. तेवढ्यात मागून चोरपावलांनी कोल्हा येतो आणि सिंहाची शेपूट खेचून पळून जातो. दचकून सिंह उठतो, इकडे तिकडे बघतो पण सिंह उठेपर्यंत कोल्हा तिथून पसार झालेला असतो. हा मजेशीर व्हिडीओ खूप लोकांनी लाईक केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment