आणि त्याने चक्क किंग कोब्राला घातली अंघोळ! पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिना संपत आला आहे. तसा उन्हाचा तडाखाही वाढतो आहे. वातावरणात सर्वत्र उष्मा आहे. अशावेळी डोक्यावरून थंड पाण्याची अंघोळ कुणाला आवडणार नाही. अर्थात कोणत्याही प्राण्याला, पक्ष्याला कडक उन्हात थंड पाण्याची अंघोळ नक्कीच आवडेल. आपण फारतर कुत्र्यांना अंघोळ घालतो. पण कुणी चक्क किंग कोब्राला अंघोळ घातल्याचे ऐकिवात नसेल. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ओडिसा येथील वनाधिकारी सुसंथ नंदा यांनी त्यांच्या ट्विटर वरून हा व्हिडीओ शेअर ज्यामध्ये एक मनुष्य चक्क एका भल्यामोठ्या किंग कोब्राला अंघोळ घालतो आहे.

हा व्हिडीओ याआधीही व्हायरल झाला आहे. किंग कोब्रा हा सापांच्या विषारी जातींपैकी एक जात आहे. ज्याच्या दंशाने मनुष्याचा मृत्यू होण्याच्याच शक्यता सर्वाधिक असतात. मात्र या व्हिडिओत हा भयानक वाटणारा किंग कोब्रा अत्यंत शांतपणे, कोणत्याही रागाशिवाय पाणी घालून घेतो आहे असे दिसते आहे. हे दिसायला सुंदर असले तरी घातक असू शकते त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू नका असेही नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हंटले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतामध्ये जंगलात अनेक विषारी सापांच्या जाती आढळतात. किंग कोब्रा हा विषारी जातीतील सर्वज्ञात साप आहे. मनुष्यवस्तीपासून दूर  दाट जंगलात राहणे हा जास्त पसंद करतो. काही मर्यादित काळापुरतेच सहचारी जीवन जगतो. याच्या विषाने मनुष्य अर्ध्या तासात मारू शकतो. हा इतर सापांना देखील खातो. भारतात दक्षिण व पूर्व जंगलात हा सापडतो. या व्हिडिओवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment