राज्यात मान्सून दाखल झाला, पण कोसळणार कधी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी तो पूर्ण सक्रियतेने बरसणार कधी याची वाट सर्वजण पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याच्या वेगाने मान्सून पुढे सरकत मुंबईसह महाराष्ट्रात व्यापला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातसह मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार १४ जून रोजी मान्सूनने वेगाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. येत्या ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला पाऊल पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

मुंबईत मान्सून रविवारी दाखल झाला असला तरीही अजून त्यानं विश्रांती घेती आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पुढील १० दिवसांत मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मान्सून येणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये दरवर्षी पाण्याचा प्रश्न उद्भवतो. या परिसरात यंदा मान्सून चांगला लागणार असल्यामुळे दिलासादायक बाब आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment