पीएम किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याची घोषणा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. फेब्रुवारी २०१९ ला ही योजना सुरु करण्यात आली असून सीमांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक ६००० रुपये जमा केले जातात ही  रक्कम २००० रुपयांच्या प्रमाणे तीन टप्प्यात दिली जाते. यावर्षीचा हा सहावा हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून अशी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ६ व्या हप्त्याची घोषणा केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभांतरणाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कृषि क्षेत्राचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी देशातील कृषि क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी १ कोटीच्या निधीची घोषणा केली. यावेळी त्यांनी पीएम किसान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यापोटी १७ हजार कोटी रूपये वितरित करताना आनंद होत असल्याचे स्पष्ट केले.

https://twitter.com/PMOIndia/status/1292341394749550594  

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात ७५ हजार कोटी रूपये वितरित करण्यात आल्याचीही माहिती दिलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची सर्वात मोठी महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या या योजनेचा लाभ ८.५ कोटी शेतकऱ्यांना होत आहे. तर १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत नाव नोंदविले आहे.

https://twitter.com/PMOIndia/status/1292341562400096258

Leave a Comment