PM Kisan Scheme | KCC च्या सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना मिळणार ३ लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; जाणुन घ्या प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांना शेतीसाठी स्वस्त कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. पैशाअभावी कोणत्याही शेतकऱ्याने शेती व्यवसाय थांबवू नये म्हणून ही योजना आखण्यात आली आहे. येत्या काही दिवसात अडीच कोटी शेतकऱ्यांना केसीसी किसान कार्ड योजनेच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री कैलाश चौधरी यांनी दिली आहे. पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांसोबत पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

चौधरी यांनी १ मार्चपासून आतापर्यंत ३ कोटी शेतकऱ्यांना ४.२२ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांना ३ महिन्यांचे व्याजही माफ केले असल्याचे त्यांनी संगितले. त्याबरोबरच पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित २५ लाख नवीन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. त्याची मर्यादा २५ हजार कोटी असणार आहे. पीएम किसान योजना आणि केसीसी च्या लाभार्थ्यांमध्ये २.५ ते ३ कोटी अंतर असल्याचे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी सांगितले आहे. सध्या साधारण ७ कोटी शेतकऱ्यांकडे केसीसी असून ९.८७ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान फंडांतर्गत वार्षिक ६०००रु दिले जातात.

केसीसी क्रेडिट कार्डवरील कर्जाचा दर ४% आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय शेतकरी १.६० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकणार आहेत. आणि वेळेवर परतफेड केल्यास ३ लाखांपर्यंत वाढीव कर्ज त्यांना मिळू शकणार आहे. सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/  या वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करता येणार आहे. या फॉर्मची प्रिंट काढून तो भरून जवळच्या व्यावसायिक बँकेत जमा करायचा आहे.  इतर माहिती वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment