आता उसापासून होईल इथेनॉल निर्मिती, ज्याने कमी होईल पेट्रोल डिझेलची आयात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही राज्यातील उसाचे क्षेत्र वाढले असून भविष्यात साखरेचे उत्पादन कमी करुन २५ टक्के ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात यावा या विषयावर आज साखर क्षेत्रातील विविध तज्ज्ञांसोबस अनौपचारिक चर्चा करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित खात्याचे प्रमुख मंत्रिमंडळात निर्णय घेतील, अशी माहिती वसंतदाद साखर संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे दिली. साखर उद्योग आणि इथेनॉल निर्मिती धोरणाबाबत विविध घटकांची बैठक पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली.

‘यंदा झालेल्या पावसामुळे पुढच्या वर्षी पुन्हा उसाचे क्षेत्र वाढून ऊसाच्या गाळपाचा प्रश्न समोर येईल, यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही चर्चा आणि प्रयत्न करत होतो. आता या निष्कर्षाशी आलोय की, साखरच केली पाहीजे असे काही नाही. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या गरजेइतकी आणि त्याहून अधिक साखर असून आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेच्या किमतीला मर्यादा आहेत. म्हणून अधिक साखर उत्पादन करण्या ऐवजी २५ ते ३० टक्के साखरेचे उत्पादन आपण कमी करुन त्याच ऊसापासून इथेनॉल शकलो, तर पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थाची आयात करावी लागते. यातील आयातीचा वाटा आपण इथेनॉल मिश्रणाने कमी करु शकतो, यासाठी आम्ही काही दिवस अर्थकारणावर अभ्यास करत होतो.” असे शरद पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचे धोरण राबविण्याचे सांगितले आहे. या धोरणाचा इथेनॉल निर्मितीच्या अर्थकारणासोबत अभ्यास करण्यात आला आहे. धोरण परडवणारे आणि अनुकूल आहे, असा निष्कर्ष निघाला आहे. हे धोरण देशासह राज्याचीही गरज आहे. यासर्व बाबींचा विचार करुन २५ ते ३० टक्के ऊस इथेनॉल उत्पादनासाठी वापरावा, हा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यावर राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेईल असेही पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment