भारतीय साखर निर्यातीला इराणने रोखले 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। इराण सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे. त्यामुळे भारताशी करार झालेला असूनही इराणने भारतातून साखर निर्यात थांबविली आहे. याचा परिणाम म्हणजे भारतीय बंदरात जवळपास २ लाख टन साखर अडकली आहे. नुकतेच केंद्र सरकारने भारतीय साखर उद्योगाला साखर निर्यातीचे उद्दिष्ट बदलून दिले होते. इराणने निर्यात थांबविली असल्याने आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता भारतीय साखर उद्योगांपुढे निर्माण झाले आहे. देशातील जुन्या आणि उच्च साखरेची निर्यात करणे पुढच्या दोन महिन्यात  आहे.

श्रीलंका, इंडोनेशिया, अफगाणिस्तान या देशातूनही भारतीय साखरेला मागणी असते. मी आणि जून महिन्यात इराणने चांगली मागणी नोंदविली होती मात्र आर्थिक संकटांमुळे तेथून मागणी कमी झाल्याचे दिसते आहे. सध्या इंडोनेशिया आणि अफगाणिस्तान इथे निर्यात होत असली तरी श्रीलंकेतूनही आर्थिक स्थितीमुळे मागणी थंडावली आहे. त्यामुळे आता सरकारने ठरवून दिलेले निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करताना साखर कारखान्यांना अवघड जाणार आहे.

सध्या पावसाची स्थिती पाहता सप्टेंबर महिन्याच्या आसपास पावसामुळे बंदराची अवस्थाही सांगता येणार नाही आहे तसेच साखर बंदरातच अडकून राहण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी आणखी दीड ते दोन लाख साखर निर्यात होऊ शकेल अशी माहिती समोर येते आहे. सध्या बाजारात एस-२ (बारीक साखरेच्या) ग्रेडच्या १०० पेक्षा कमी इकूम्सा  (ICUMSA) असणाऱ्या भारतीय साखरेला अधिक मागणी आहे. या साखरेला क्विंटलला २४०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. एस-३० या मोठ्या साखरेला मात्र मागणी कमी असल्याचे दिसून येते आहे.

Leave a Comment