कांदा आता रडवणार नाही, Tata Steel ने काढला नवीन तोडगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आता कांद्याची कमतरता भासणार नाही. देशातील नामांकित स्टील कंपनी असलेली टाटा स्टील कांद्याच्या साठवणुकीसाठी एक नवी पद्धत घेऊन आली आहे. टाटा स्टीलच्या कंस्ट्रक्शन सोल्यूशन्स ब्रँड नेस्ट-इनने कांद्याच्या साठवणुकीसाठी अ‍ॅग्रोनेस्ट बाजारात आणला आहे ज्याचा हेतू सध्याच्या पातळीपेक्षा कांद्याचा अपव्यय निम्म्याने कमी करणे हा आहे. नेस्ट-इन आणि इनोव्हेंट टीम्सने हे अ‍ॅग्रोनेस्ट विकसित केले आहेत. हे स्ट्रक्चरल डिझाइनसह वेअरहाऊस सोल्यूशन प्रदान करते जे हवेचा प्रवाह सुधारण्यास मदत करते.

हे नवीन वेअरहाऊस मोठे आहे तसेच कांद्याच्या लांब आणि सुरक्षित संग्रहासाठी उपयुक्त देखील आहे. हे आर्थिक खर्चात पिकाचे कमीतकमी नुकसान होण्याची हमी देते. तापमान, आर्द्रता आणि गॅसचे निरीक्षण करण्यासाठी या वेअरहाऊस मध्ये सेन्सॉर लावलेले आहेत जेणेकरून उत्पन्नातील बिघाड दिसून येईल.

हे स्मार्ट वेअरहाउस विज्ञान, लेटेस्ट इनोवेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले गेले आहे. सायंटिफिक स्टोरेज सिस्टमच्या कमतरतेमुळे, खराब डिझाइन आणि साहित्याचा वापर यामुळे 40 टक्के कांदा वेअरहाउसमधेंच खराब होतो. वाहतुकीची अडचण, हवामानातील बदलांमुळे कांद्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याची लाइफ हेल्दी सेफ ठेवणे सारख्यां अनेक आव्हानांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment