उघड्यावर फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महापालिकेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता उघड्यावर फळ विक्री करणाऱ्या तसेच अन्न शिजवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या आरोग्य आणि अतिक्रमण विभागाने मध्यवर्ती बस स्थानकासमोर उघड्यावर अन्नपदार्थ तयार करणाऱ्या तसेच फळे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली.

यामध्ये अस्वच्छतेच्या कारणावरून तीन हातगाड्या पथकाने ताब्यात घेतल्या. सांगलीच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात फळे विक्री करणाऱ्या हातगाड्या आहेत. या गाड्यांवर उघड्यावर पदार्थ शिजवले आणि विकले जातात. यावेळी स्वच्छतेची काळजी किंवा खबरदारी घेतली जात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला महत्व आल्याने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी याकडे विशेष लक्ष दिले आहे.

यामुळे आज मध्यवर्ती बस स्थानकासमोरील हातगाड्यावर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य आणि अतिक्रमण विभागाने आज बसस्थानकावरील या विक्रेत्यांवर कारवाई केली. यात अस्वच्छता असणाऱ्या हातगाड्या हटवण्यात आल्या असून तीन हातगाड्या पथकाने ताब्यात घेतल्या. या कारवाईत सहायक आयुक्त सहदेव कावडे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, विकास कांबळे, वैभव कुदळे अतिक्रमण पथकाचे विक्रम घाडगे यांच्यासह टीमने सहभाग घेतला.

सांगली जिल्ह्यातील  ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग

 

Leave a Comment