१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार वृक्ष आहे, या वृक्षापासून तेल आणि लाकूड अशा दोन्ही औषधी बनवता येतात. याच्या अर्काचा वापर खाण्यापिण्यात फ्लेवर म्हणून वापर होतो. साबण, कॉस्मेटिक्स आणि परफ्युम मध्ये पांढऱ्या चंदनाच्या तेलाचा वासासाठी वापर केला जातो.

 खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) नाशिक मधील प्रशिक्षण भूमीत २६२ एकर जमिनीवर चंदन आणि बांबूच्या झाडांची लागवड केली. त्यांनी चंदन आणि अगरबत्ती बनवायच्या कामी येणारी बांबू टुल्डा ची ५००-५०० झाडे लावली. त्यांना १०-१५ वर्षात तयार होणाऱ्या चंदनाच्या झाडापासून ५० कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. आणि बांबूच्या झाडांपासून तीन वर्षानंतर दरवर्षी ४-५ लाख रुपयांचा फायदा मिळण्याचा अंदाज आहे. सरकारने चंदनाची शेती करण्यास मान्यता दिली आहे. मात्र लोकांना याबद्दल माहिती नाही असे शेतकरी अविनाश कुमार यांनी सांगितले आहे.

अविनाश यांनी सांगितले की ऑरगॅनिक शेती केल्यावर चंदनाचे झाड १०-१५ वर्षात तयार होते. तर पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास एका झाडाला तयार होण्यासाठी २०-२५ वर्षे लागतात. इतर रोपांच्या तुलनेत चंदनाचे रोप महाग मिळते. जर एकदम सगळी रोपे खरेदी केली तर ४००रुपये सूट मिळते. चंदनाच्या एका झाडापासून सहज ८-१० लाकूड मिळू शकते. चंदनाच्या लाकडाचा देशात भाव ८-१० हजार रुपये प्रति किलो आहे. विदेशात याची किंमत २०-२५ हजार रुपये प्रति किलो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment