धावत्या कारवर फटाके फोडल्यामुळे अहमदाबाद पोलिसांनी तरुणांना दिली ‘हि’ शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सगळीकडे दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. कोरोना महामारीनंतर लोक मोठ्या प्रमाणात या सणाचे सेलिब्रेशन करीत आहेत. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते तरुणाईपर्यंत सगळेच फटाके फोडण्यामध्ये मग्न असतात. फटाके फोडतानाचा व्हिडिओ अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण धावत्या कारवर जल्लोष करीत फटाके फोडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) या तरुणांना अजब शिक्षा दिली आहे.

जीवाशी खेळ करीत व्हिडिओ बनवण्याचा अतिरेक अंगलट
अनेक तरुण-तरुणी वेगवेगळे स्टंट्स करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असतात. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या लोकांचा उत्साह आणखी द्विगुणीत होतो. मात्र याच उत्साहात अनेक जण स्वतःच्या जीवाशी खेळ करीत व्हिडिओ बनवतात. अहमदाबादमध्ये तेथील तरुणांनी अशाच प्रकारे अतिरेक करीत व्हिडिओ बनवला. धावत्या कारवर जल्लोष करत त्यांनी फटाके फोडले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) या तरुणांना चांगलीच अद्दल घडवली.

अहमदाबाद पोलिसांनी सर्वांनाच रांगेत उभे केले आणि उपस्थित लोकांसमोर उठाबशा काढायला भाग पाडले. अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तरुणाईला दिलेला शिक्षेचा व्हिडिओ शेअर केला आहे. काहींनी अहमदाबाद पोलिसांच्या शिक्षेवर टीका केली आहे तर काही लोकांनी पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेचे कौतुक केले आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती