नगर हादरलं ! कार नदीत बुडाल्यामुळे दोघांचा मृत्यू तर एकजण बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोले : हॅलो महाराष्ट्र – राज्यभरात सध्या सगळीकडे मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वळणाचा अंदाज न आल्याने पर्यटकांची कार (car drowned in river) कृष्णवंती नदीपात्रात बुडून औरंगाबादच्या दोघांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मदतीसाठी धावलेला तिसरा नाशिकचा पर्यटक नदीप्रवाहात बेपत्ता झाला आहे. कारमधील (car drowned in river) एक पर्यटक सुदैवाने बचावला आहे. कोल्हार- घोटी रस्त्यावर वारंघुशी फाट्याजवळ (car drowned in river) ही घटना घडली आहे.

अ‍ॅड. आशिष प्रभाकर पालोदकर, रमाकांत प्रभाकर देशमुख अशी मृत दोघांची नावे आहेत. बुडणार्‍यांना मदत करणारे नाशिकचे तुकाराम रामदास चांगटे हे मात्र बेपत्ता झाले आहेत. अ‍ॅड. अनंता रामराव मगर हे सुदैवाने यामधून (car drowned in river) बचावले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली असून दोघे मृत (car drowned in river) औरंगाबाद येथील रहिवाशी होते. तसेच ते पेशाने वकील होते.

आधार कार्डावरून पटली ओळख
कारमधील मृत आशिष हे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस नेते प्रभाकर पालोदकर यांचे चिरंजीव होते. आशिष व रमाकांत हे दोघे जीवलग मित्र होते. मृत्यूच्या (car drowned in river) दाढेतून परत आलेले अनंता हे प्रचंड घाबरल्याने त्यांना मृतांची नावेही सांगता येत नव्हती. पोलिसांना मृतांच्या पँटच्या खिशातील आधार कार्डवरुन दोघांची ओळख पटविण्यात यश आले.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment