पाटबंधारे विभागाचे नावाने शेतकऱ्यांनी केले प्रतिकात्मक पिंडदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। नांदूर मधमेश्वर धरणातून वाहणाऱ्या ओव्हर फ्लोच्या पाण्याने पुणतांबा परिसरातील पाझर तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी शिर्डी जवळील पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे प्रतिकात्मक पिंडदान करत, शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचा दशक्रीया विधी घालून, अनोख आंदोलन केले.

गोदावरी नदीच्या तीरावर असलेलल्या पुणतांबा गावातील शेतकरी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी आजही संघर्ष करत आहेत. गोदावरी नदितून वाहणाऱ्या ओव्हर फ्लोच्या पाण्यान परिसरातील पाझर तलाव भरून द्यावेत. अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी पाटबंधारे विभागाकड विविध मार्गान पाण्याची मागणी करत आहेत. मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकड प्रशासन दुर्लक्ष करत असून, अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.

त्यामुळे पाटबंधारे विभागाला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी, पुणतांबा इथं गोदावरी नदिच्या तीरावर पाटबंधारे विभागाच्या नावाने पिंडदान करत दशक्रीया विधी घातलाय. तसेच मुंडण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आता तरी प्रशासनाला जाग येवून पुणतांबा परिसरातील पाझर तलाव भरून मिळतील अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment