कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक ; ‘एम्स’च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी देशभरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील दिला आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सावधगिरी बाळगायला हवी, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, कोरोनाचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य असल्याने भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष गटाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी भारत सक्षम असून, त्या दिशेले पावले उचलली जात आहे, असेही डॉ. गुलेरिया नमूद केले.

ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच आला असण्याची शक्यता आहे. पण भारतात मागील काही आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतातील रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांवर परिणाम करु शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे, जेणेकरुन याच्या प्रादुर्भावाला आळा बसेल,” असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment