’30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद आहे म्हणता, तर एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?’- ओवैसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. जर तुम्ही 30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढं सर्व होईपर्यंत काय करत होते?, झोपा काढत होते का? असा खणखणीत सवाल ओवैसींनी केला आहे. सोमवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

“मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यावेळी काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? 30 ते 40 हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी” असं आव्हान ओवैसी यांनी दिलं आहे.असदुद्दीन ओवैसी यांनी “द्वेष निर्माण करणं हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. हा वाद हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये आहे. आता कोण जिंकणार हे तुम्हीच ठरवणार आहात” असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी लव जिहाद प्रकरणावरून असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. ओवैसी यांनी लव जिहादवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. “विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम 14 आणि 21 चं उल्लंघन होणार आहे. त्यांनी संविधानाचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार करणं आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करत आहे” असं ओवैसी यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment