Air India करणार फ्लॅट्स आणि प्रॉपर्टीची विक्री ! दिल्ली-मुंबईसह 10 मोठ्या शहरांमध्ये 13.3 लाखांमध्ये विशेष सवलती सह खरेदी करा घरे*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कर्जबाजारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) आता पैसे गोळा करण्यासाठी देशातील अनेक शहरांमधील आपले फ्लॅट आणि इतर मालमत्ता (यात residential, commercial आणि plots चा समावेश आहे) विक्री करण्याची योजना आखत आहे. एअर इंडियाने या माध्यमातून 250 ते 300 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. ही मालमत्ता देशाच्या 10 मोठ्या शहरांमध्ये निवासी ठिकाणी आहे. 18 जून रोजी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, त्यासाठी ई-बिडिंग घेण्यात येणार आहे. ते 8 जुलै 2021 पासून सुरू होईल आणि 9 जुलै 2021 रोजी बंद होईल.

13.3 लाखांची प्रारंभिक बोली असेल
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, या युनिटची प्रारंभिक बोली 13.3 लाख रुपयांपासून सुरू होईल. ग्राहकांना दीडशे कोटी रुपयांपर्यंत बोली लावता येणार आहे. या लिलावाच्या स्लॉटमध्ये बर्‍याच मालमत्ता आहेत, ज्या यापूर्वी अनेकदा विक्रीसाठी ठेवल्या गेल्या आहेत.

या शहरांमध्ये आहेत मालमत्ता
एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार मुंबईत एक निवासी प्लॉट आणि फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्तांची विक्री करेल. त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये बुकिंग ऑफिस आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमधील 6 फ्लॅट्स, नागपुरात बुकिंग ऑफिस, एअरलाइन्स हाऊस आणि भुजमधील एक निवासी प्लॉट आणि तिरुअनंतपुरममध्ये एक निवासी प्लॉट आणि मंगरुळ येथे दोन फ्लॅट आहेत.

10 टक्के पर्यंत सूट
एअर इंडियाने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी यातील काही मालमत्तांमध्ये विशेषत: टीयर 1 शहरांमध्ये राखीव किंमत कमी केली आहे. म्हणजेच टीयर 1 शहरांमध्ये एअरलाइन्स कंपनी प्रॉपर्टी खरेदीवर विशेष सवलत देईल. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याची विनंती केली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या मालमत्तांमध्ये सुमारे 10 टक्के कपात करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment