नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी भारती एअरटेलने 179 रुपयांचे प्रीपेड पॅक बाजारात आणला आहे. दोन लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण असलेले भारती अॅक्सए लाइफ इन्शुरन्स ( (Bharti AXA Life Insurance) देखील या पॅकमध्ये समाविष्ट आहेत. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, 179 रुपयांच्या या नवीन प्रीपेड पॅकद्वारे अमर्यादित कॉल (अनलिमिटेड कॉल), 2 जीबी डेटा, 300 एसएमएस आणि भारती एक्सए लाइफ इन्शुरन्सचा कोणत्याही नेटवर्कवर ग्राहकांना 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
वैधता (validity) 28 दिवस असेल
या पॅकची वैधता 28 दिवस असेल. हे खासकरुन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन ग्राहक आणि सेमी-शहरी आणि ग्रामीण बाजारात फीचर फोन वापरणार्या ग्राहकांसाठी सादर केले गेले आहे.
18 ते 54 वर्षे वयोगटातील लोकांना विमा संरक्षण मिळेल
कंपनीने म्हटले आहे की हे विमा संरक्षण 18 ते 54 वर्षे वयोगटातील लोकांना उपलब्ध असेल. यासाठी कोणतीही कागदपत्रे किंवा वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार नाही. विमा पॉलिसी किंवा प्रमाणपत्र त्वरित डिजिटल स्वरूपात पाठविले जाईल. विनंती केल्यावर त्याची प्रतही उपलब्ध करुन दिली जाईल.निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा हे प्रीपेड बंडल खरेदी करणारे ग्राहक या पॅकद्वारे रिचार्ज करतील तेव्हा ते स्वत: ला सुरक्षित ठेवण्यात आणि त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करण्यास सक्षम असतील.