टीम इंडियाचा ‘हा’ दिग्गज झाला फिट, पुढील महिन्यात ‘या’ मोठ्या स्पर्धेतून करणार पुनरागमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 8 सप्टेंबरपासून भारताच्या देशांतर्गत क्रिकेट सीजनला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी दुलीप ट्रॉफीचे सामने होतील. टीम इंडियात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भारतीय खेळाडूंसाठी हा देशांतर्गत सीजन महत्वाचा मानला जातो. भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) या स्पर्धेतून पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत आहे. सध्या कसोटी संघाबाहेर असलेला अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) दुखापतीमधून सावरला आहे. मुंबई क्रिकेट टीम मधून देशांतर्गत क्रिकेट मध्ये तो पुनरागमन करणार आहे.

मुंबईच नेतृत्व करणार रहाणे
अजिंक्य रहाणेला (ajinkya rahane) आयपीएल 2022 दरम्यान दुखापत झाली होती. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलटेशन कार्यक्रमात सहभागी झाला होता. आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. रहाणेने संपूर्ण सीजन मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी कटिबद्धता दाखवली आहे. तो मुंबईचे नेतृत्व सुद्धा करणार आहे.

दुलीप ट्रॉफी मधून पुनरागमन
रहाणे (ajinkya rahane) 8 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. “राहणे मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे निवडकर्ते थेट त्याला भारत अ संघात निवडणार नाहीत. कारण चांगली कामगिरी करणारे अन्य खेळाडूही प्रतिक्षेत आहेत. दुलीप ट्रॉफी मध्ये तो पश्चिम विभागाकडून खेळणार असल्याचे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!