व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर; राज्यपालांची भेट घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही.

राज्यपाल कार्यालयाने ट्विट करुन या भेटीची माहिती दिली आहे. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवल यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. अस ट्विट करत राज्यपाल कार्यालयाने या भेटीचे फोटो शेअर केले.

दरम्यान, राज्यपालांच्या भेटींनंतर अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भेटणार आहेत. त्यांच्याकडून सुरक्षाविषयक आढावा घेणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.