व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजितदादांच्या गाडीचे स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती; दोन्ही नेत्यांकडून भल्या पहाटे मुंबईत सफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवसेनेचे युवराज आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत भल्या पहाटे मुंबईची सफर करत विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे गाडीचे सारथ्य आदित्य ठाकरे यांच्या कडे होते.

यापूर्वी बारामतीमध्ये अजित पवार यांनी गाडीचं सारथ्य केलं होतं तर, उद्धव ठाकरे त्यावेळी बाजूला बसले होते. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. महालक्ष्मी, रेसकोर्स  वरळी , धोबी तलावंची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या या एकत्रित दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे लढणार का या चर्चेला उधाण आले आहे.