Wednesday, February 8, 2023

नानांची भूमिका महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी; अजितदादांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यानंतर अजित पवार संतापले असून याप्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

अजित पवार यांनी पटोले यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. नाना पटोले यांच्या अशा आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची अजित पवार यांनी म्हंटल. नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी आहे, असं अजित पवारांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

सुरक्षा दिली म्हणजे पाळत ठेवली असा नव्हे; नवाब मलिकांचा हल्लाबोल

नाना पटोले यांचे आरोप हे माहिती अभावी असून सुरक्षा दिली म्हणजे पाळत ठेवली असा नव्हे अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले. एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असो वा आंदोलन, ती माहिती संकलित करणे हे गृहखात्याचे काम असत. जर नाना पटोले यांना याबाबत अधिक माहिती नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे अशा माजी मुख्यमंत्र्यांना विचारावे असेही मलिक यांनी म्हंटल. जर त्यांना वाटत असेल की त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तस पत्र त्यांनी गृहखात्याला पाठवावे असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला.