अजित पवारांनी लगावला उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. “माझा नवरा वेश बदलून बाहेर जायचा, असे एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितले आणि तेच नेते म्हणत होते की, यात आमचा काहीही संबंध नाही आहे,” असे पवार यांनी म्हंटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते म्हणाले की, माझ्या ऐकण्यात आले कि आका मंत्र्याच्या पत्नीने आका मुलाखतीत माझा नवरा वेश बदलून बाहेर जायचा असे म्हंटले आहे. मात्र, तोच नेता आमचा यात काहीही संबंध नाही, असे म्हणत आहे. याला काय म्हणायचे आता. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात धाकधूक असल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार पुढे ढकलला आहे. 11 तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.

आगामी निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत सोमवारी निर्णय – पवार

यावेळी अजित पवारांनी ओबीसी आरक्षण व स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा जमा झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळायला हवे, अशी सर्वांचीच भूमिका आहे. ओबीसी वर्गाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी, अशी आमची भूमिका आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढाव्यात की नाही याबाबतचा निर्णय सोमवारी मुंबईत एकत्र बसून घेतला जाईल, असे पवार यांनी म्हंटले.

Leave a Comment