हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून “देशी कट्ट्याने ठार मारू”, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे, असे पवार यांनी म्हंटले आहे.
अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शरद पवार साहेबांना जी धमकी देण्यात आली आहे. त्याबाबत त्यांचे स्वीय सहाय्यक राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत. परंतु, त्यांचे फोन येते होते, ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती. दिवाळीत हे फार चालू होतं.
त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला : पवा
दरम्यान, अजित पवार यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सातत्याने अपशब्द वापरण्याचे वाचाळवीरांचे काम थांबणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.