पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून फडणवीस अजितदादामध्ये खडाजंगी; इंधन दर कमी करण्यावरून आले ‘हमरी-तुमरीवर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता याच मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत पेट्रोल दरवाढी वरील टॅक्स कमी करण्याचा सल्ला दिला तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती असते अस म्हणत अजितदादांनी फडणवीसाना फटकारले.

शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधीत मोर्चा काढण्याऐवजी राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शिवसेनेने मोर्चे न काढता, नौटंकी न करता जे आम्ही केलं होतं ते करुन दाखवावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केली. वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी महाराष्ट्रात मोगलाई आली असल्याची टीका केली. संपूर्ण महाराष्ट्रात आपण निदर्शन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती – अजितदादा 

दरम्यान, पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती असते आणि देशातल्या आणि राज्यातल्या लोकांनी जर केंद्र सरकारने उद्या पेट्रोल १०० रुपये लीटर केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नये अस म्हणत स्वत:चं अपयश करण्यासाठी हे वक्तव्य केलं असावं अस पलटवार अजित पवारांनी फडणवीसांवर केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like