कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं होतं?? हे सांगू का ; अजितदादांनी विरोधकांना फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षांकडून मुंडेंवर अजूनही टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरले आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार म्हणाले, आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. विरोधकांचं टीका करणं हे काम आहे. पण ती कोणत्या पातळीपर्यंत असावी याला मर्यादा आहेत, असं सांगतानाच मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? असा इशारा त्यांनी दिला. कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची केस रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. कौटुंबिक कारण देत त्यांनी केस मागे घेतली. त्यामुळे धनंजय मुंडे यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार यांनी देखील मुंडेंबाबत आपली भूमिका ही योग्यच होती अस सांगत धनंजय मुंडेंची पाठराखण केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment