पक्षाचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने समाजवादी पार्टीच्या एका कार्यकर्त्याने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला अपेक्षित यश मिळवता न आल्यामुळे लखनऊजवळील चिनहट येथील एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच या तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

विजय यादव उर्फ ​​नरेंद्र असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे असून तो चिनहटच्या कामता येथील रहिवासी आहे. नरेंद्र याची विभूतीखंड येथील अवध बसस्थानकाशेजारी चहाची टपरी आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्याने आपली चहाची टपरी बंद ठेवली होती. यादरम्यान नरेंद्रने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. ज्यामध्ये त्याने 2022 मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन झालं नाही, तर मी विष प्राशन करून आत्महत्या करणार असे म्हंटले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

यानंतर काल सायंकाळी जेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा नरेंद्रला अपेक्षित असणारं सपाचं सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे नरेंद्र यानं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटल्यानुसार त्याने गुरुवारी सायंकाळी पारिजात अपार्टमेंटजवळ विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भररस्त्यात त्यानं हा प्रकार केला होता. त्याला होणारा त्रास पाहून आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती तातडीनं नरेंद्रच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर नरेंद्रच्या कुटुंबीयांनी त्याला त्वरित लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment