छावा संघटनेच्या ‘या’ जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांचा पुतण्या बेपत्ता

अकोला : हॅलो महाराष्ट्र – छावा संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांचा अल्पवयीन पुतण्या काल रात्रीपासून आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. संभाजी काळे असे या बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. तो अकोल्यातील सांगळूद या ठिकाणाहून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता संभाजी काळे हा अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. तो स्वतःहून घर सोडून गेला, की त्याचं अपहरण हे अद्याप समजू शकले नाही. मात्र तो घर सोडून पळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाजी काळे याचा फोटो कुटुंबीय आणि पोलिसांकडून संपूर्ण शहरात जारी करण्यात आला आहे. कोणालाही त्याच्याविषयी माहिती मिळाली किंवा तो सापडला, तर जवळच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
काल रात्रीपासून आपल्या राहत्या घरातून छावा संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांचा पुतण्या बेपत्ता झाला आहे. संभाजी काळे असं रणजित काळे पाटील यांच्या पुतण्याचे नाव आहे.

अकोल्यातून बेपत्ता
संभाजी काळे हा अकोल्यातील सांगळूद या ठिकाणाहून बेपत्ता झाला आहे. तो स्कूल ऑफ स्कॉलरमधे इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. तो स्वतःहून घर सोडून गेला, की त्याचं अपहरण हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात संभाजी काळे याचा फोटो जारी करण्यात आला आहे. त्याच्याबद्दल कोणालाही माहिती मिळाली किंवा तो सापडला, तर जवळच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी व पोलिसांनी केले आहे.