जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
खान्देशात प्रत्येक सणाचे स्वतःचे असे महत्व असून अक्षय तृतीया या सणाच्या तिथी, मुहूर्त यांचा या मनुष्ययोनीत जन्माला आलेल्या जीवाने योग्य उपयोग केला जातो. अक्षय तृतीया’ ही अशीच एक तिथी, वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे फार महत्व आहे.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय’ ( संपणारे) असे मिळते, असा समज आहे. तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
तसेच या सणाला सर्व महिला या आपल्या माहेरी जाऊन सर्व मैत्रिणी एकत्र येतात आणि झोका क्षेत्रांत अहिराणी भाषेत गाणे म्हणतात.
आपल्या पूर्वजांनी नैवद्य दिला जातो त्यासाठी सर्व नातेवाईक हे एक ठिकाणी एकत्र येतात महत्वाचं म्हणजे खापराची पुरणपोळी खान्देशात तयार केली जाते आणि सोबत आमरस जेवण बनवून पूर्वजांच्या स्मूतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या फोटो ची पूजा करून त्यांना आमरसाचा नैवद्य दिला जातो अशा प्रकारे सर्व कुटुंबाचे सदस्य मिळून आगारी म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवू घालतात.