Akshaya Tritiya Offer : आता फोन पे वर खरेदी करा सोनं अन् मिळवा मोठी सूट; सर्टिफिकेटही मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर (Akshaya Tritiya Offer) आपल्या App वरून सोने-चांदी खरेदी करण्यासाठी PhonePe ने ग्राहकांना आकर्षक ऑफर देत आहेत. PhonePe ही एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट कंपनी आहे. ग्राहकांना या App द्वारे 24K शुद्धतेचे सोने मिळेल. या द्वारे खरेदी केलेले सोने आपल्याला बँकेने इन्शुअर्ड केलेल्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येईल. तसेच आपल्याला ते कॉईन्स किंवा बारच्या स्वरूपातही ठेवता येईल. याची आपल्याला घरपोच डिलिव्हरी देखील मिळेल. Akshaya Tritiya Offer

या App द्वारे ग्राहकांना 24K शुद्धतेच्या सोन्याबरोबरच 99.99 टक्के शुद्धतेची चांदी देखील मिळेल. तसेच कंपनीने एका निवेदनात असेही म्हटले आहे कि, सोन्याची नाणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ते शुद्धतेचे प्रमाणपत्रही देणार आहेत. या ऑफर अंतर्गत युझर्सना सोन्याच्या खरेदीवर 2,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील दिला जाईल. तर चांदीची नाणी किंवा बार खरेदी करणाऱ्या युझर्सना 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. ही ऑफर 3 मे पर्यंत व्हॅलिड असेल. Akshaya Tritiya Offer

सर्वोच्च शुद्धता असलेली चांदीची नाणी आणि बार ऑफर करण्यासाठी कंपनीने SafeGold शी करार केला आहे. याबात कंपनीने सांगितले की,” ते MMTC PAMP आणि SafeGold या दोन्हींकडून सर्वोच्च शुद्धतेच्या सोन्याची ऑफर देतात. तसेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चांगल्या डिझाइनची सोन्याची आणि चांदीची नाणी तसेच बारची डिलिव्हरी मिळवण्यासाठी ग्राहक डोरस्टेप डिलीव्हरीची देखील निवड करू शकतात. या डिलिव्हरीचा विमा देखील उतरविला जाईल. Akshaya Tritiya Offer

Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Mahindra Cars Price : Bolero पासून Scorpio पर्यंत महिंद्राच्या सर्व 10 गाड्यांच्या नव्या किंमती काय? फक्त 2 मिनिटांत घ्या जाणुन

Surya Grahan 2022 : भारतात दिसणार का हे सुर्यग्रहण; जाणुन घ्या कधी अन् कुठून दिसणार, काय होणार परिणाम?

Leave a Comment