Sunday, February 5, 2023

अलर्ट ! जर तुमची मुलेही स्मार्टफोनवर करत असतील ‘हे’ काम तर मग तुम्ही काही मिनिटांतच व्हाल कंगाल, नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । आयफोनवर गेम्स खेळणे किती महागात पडू शकते याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. मात्र अशी एक व्यक्ती अशी आहे ज्याला त्याबदल्यात लाखो रुपये मोजावे लागले. खरं तर, 41 वर्षीय मुहम्मद मुतझाच्या मुलाला स्मार्टफोनवर गेम खेळण्याची वाईट सवय आहे, ज्यासाठी त्याला नुकसान सहन करावे लागले. हे प्रकरण यूके मधील आहे. जिथे मोहम्मद मुर्तझाच्या 7 वर्षाच्या मुलाने त्याच्या वडिलांचे सुमारे 1.3 लाख रुपये Dragons: Rise of Berk या गेमवर खर्च केले. गेमच्या इन अ‍ॅप परचेज (in app purchase) ऑप्शनचा उपयोग करून मुलाने एक लाखाहून अधिकचे ट्रान्सझॅक्शन केले. तेही अवघ्या एका तासात.

इतके मोठे बिल कसे तयार केले गेले ?
डेली मेलच्या वृत्तानुसार, या-वर्षाच्या मुलाने आयफोनवर Dragons: Rise of Berk या गेमचे फ्री वर्जन खेळताना $ 1,800 (सुमारे 1.3 लाख रुपये) चे बिल केले. या मुलाने गेम खेळत असताना इन अ‍ॅप खरेदी केली. पालकांना याची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा 1800 डॉलर्सचे बिल 29 ईमेल रिसीप्टच्या रूपात आले.

- Advertisement -

मिळाला 287 डॉलर्सचा रिफंड
Apple iTunes चे एवढे बिल आल्यानंतर मुलाच्या वडिलांना त्यांची कार Toyota Aygo विकावी लागली. यासह त्यांनी Apple स्टोअरमध्येही याबाबत तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर त्यांना 287 डॉलर्सचा रिफंड देण्यात आला. तथापि, या अहवालात मुलाने ऑथेंटिकेशन कसे बायपास केले हे मात्र सांगण्यात आलेले नाही. कृपया हे लक्षात घ्या की, कोणत्याही इन अ‍ॅप खरेदीसाठी अकाउंट पासवर्ड किंवा बायोमेट्रिक्सचे ऑथेंटिकेशन आवश्यक आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group