‘आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या…’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी 8 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले संप अद्यापही सुरूच आहे. यासंदर्भात राज्य शासन कुठलाही निर्णय घेत नसल्याने शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील 172 कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात संपकरी कर्मचाऱ्यांनी म्हटले की, आम्हाला सध्या तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा हाकावा लागतो. तसेच अन्य प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आमच्याही मनात सतत आत्महत्या करण्यासारखे विचार येतात‌. वारंवार निवेदने देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहोत. आता सरकारकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आम्ही वैतागलो आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देऊन आमचे आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्तता करावी, अन्यथा आम्हाला स्वेच्छा मारण्याची परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment