मार्च संपत आला तरी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; जीएसटीची रक्कम २४ कोटींच्या घरात

औरंगाबाद | मार्च महिना संपत आला तरी राज्य सरकारकडून महापालिकेला जीएसटीची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जीएसटीची रक्कम मिळावी, यासाठी पालिकेकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.

राज्य सरकारकडून महापालिकेला दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जीएसटीची रक्कम दिली जाते. सरकारकडून मिळणारी ही रक्कम २४ कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी सुमारे २१ कोटी रुपये अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केले जातात. सरकारकडून जीएसटीची रक्कम मिळाल्यावर साधारणपणे १० तारखेपर्यंत पगार केले जातात.

मार्च महिन्यात मात्र अद्याप सरकारने महापालिकेला जीएसटीची रक्कम दिली नाही. त्यामुळे मार्चअखेर जवळ आलेला असला, तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. सरकारने जीएसटीची रक्कम लवकर द्यावी, यासाठी पालिकेचे प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

You might also like