औरंगाबाद | राज्य सरकारने मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण काढून घेतल्यामुळे संपूर्ण राज्यभरातून अनेक आंबेडकरवादी संघटना याचा निर्णयाचा निषेधव्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीने उद्या भडकल गेट येथे मुंडण आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनामध्ये आंबेडकरवादी कृती समितीकडून सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात येणार आहे.
हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी आंबेडकरवादी कृती समितीच्या सचिन निकम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, “मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणा बद्दल जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तो निर्णय घाईघाईत घेतलेला निर्णय असून. मागास्वर्गीयांवर झालेला अत्याचार आहे. राज्यभर यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला असताना. मुळात जाणीवपूर्वक जातीय तेढ हे सरकार निर्माण करत आहे, उद्याच्या मुंडन आंदोलनाद्वारे आम्ही राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करणार आहोत.