ऍम्ब्युलन्स हेल्प रायडर यांनी वाचवले ४० जणांचे प्राण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद । हेल्प रायटरचे चारशे स्वयंसेवक रस्त्यावरती 24तास करत आहे रुग्णांची सेवा. हेल्प रायडर औरंगाबाद शहराच्या चौकात चौकात थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या ॲम्बुलन्सला मदत करत आहे. हे हेल्प रायडर आपापल्या घरातले काम आटपून जसा वेळ भेटेल तसे हे हेल्प रायडर समूहाला वेळ देत असता कोणालाही जर काही मदत लागली असल्यास त्यांची एक अधिकृत वेबसाइड आहे त्या वेबसाईट मध्ये त्यांनी हेल्पलाइन नंबर दिलेले आहेत तसेच फेसबुक वरती ही यांचे नंबर त्यांनी पसरविले आहेत या हेल्प रायडर मध्ये वयोवृद्ध देखील काम करत आहे

हेल्प रायटर टीम औरंगाबाद शहरातील हॉस्पिटल मध्ये जाऊन तिथल्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहे त्यांना काही मदत हवी का ही सगळी माहिती घेऊन आपल्या ऍम्ब्युलन्स हेल्प रायडर या वेबसाईट वरती टाकतात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आतापर्यंत या स्वयंसेवकांनी 40 जणांचे प्राण वाचवण्यास यश आलेला आहे

सर्व माहिती आम्हाला सावरकर चौक येथील सेवा करत असलेल्या स्वयंसेवकांकडून मिळाली. या काळात समाजसेवा करणारे लोक फार थोडे आहे अश्यात आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने हि संस्था सुरु करण्यात अली आहे आणि कोरोना संपेपर्यंत हि संस्था अशीच काम करत राहणार आहे.

Leave a Comment