ट्विटर-फेसबुकने घातली बंदी, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने लाँच केले GETTR

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुक व ट्विटरवर बऱ्याच काळापासून बंदी आहे. यामुळे ट्रम्पच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. खरं तर ट्रम्प यांचे सोशल मीडियावरील प्रेम आणि आवड पाहता त्यांच्या टीमने चक्क एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच लाँच केला आहे. ट्रम्पचे माजी ज्येष्ठ सल्लागार जेसन मिलर यांनी फ्री स्पीच आणि “पूर्वग्रह न ठेवता” कंटेटला चालना देण्यासाठी ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म GETTR लाँच केले आहे. तथापि, आतापर्यंत माजी राष्ट्रपतींनी या प्लॅटफॉर्मवर आपले अकाउंट तयार केलेले नाही.

Google Play Store आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर फ्री मध्ये डाउनलोड करण्यासाठी GETTR उपलब्ध आहे. हे अ‍ॅप ब्राउझरद्वारे देखील वापरले जाऊ शकते. अ‍ॅप स्टोअर वापरण्यासाठी हे ‘M’ म्हणून रेट केले गेले आहे, याचा अर्थ असा आहे की, केवळ 17 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या युझर्सनीच ते वापरावे. हे अ‍ॅप ट्विटरसारखे आहे जे मायक्रोब्लॉगिंग साइटच्या अनेक फीचर्ससह सुसज्ज आहे.

GETTR लाँच करणारे मिलर म्हणाले कि,” माजी अध्यक्ष ट्रम्प जरी याक्षणी आमच्या प्लॅटफॉर्मवर आलेले नसले तरी माझ्याकडे अजूनही त्यांचे GETTR हँडल ‘realDonaldTrump’ राखीव आहे. ते यावेळी म्हणाले की,”जर ते या वेळी आमच्याकडे पहात असतील तर आम्ही त्यांना या प्लॅटफॉर्मवर येण्याचे आवाहन करतो.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment