शेतकरी आंदोलनावर अमेरिकेकडून मोठं विधान; मोदी सरकारला केलं ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा मिळत आहे. अशा वेळी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आंदोलनावर मोठं भाष्य केले आहे. आंदोलन करण्याचा अधिकार मान्य करतानाच खासगी गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याशिवाय कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे. अमेरिकेतील कलाकारांसह विविध संस्था, संघटनांनी भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य केल्यानंतर अमेरिकन सरकारने आता या आंदोलनाबाबत मत व्यक्त केले आहे.

शांततामय पद्धतीने सुरू असलेले आंदोलन हे लोकशाहीचा भाग आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही हेच म्हटले आहे. जर दोन्ही पक्षांत काही मतभेद असतील, तर ते चर्चेतून सोडवायला हवेत, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. म्हत्वाचे म्हणजे जो बायडेन प्रशासनाकडून पहिल्यांदाच भारतात सुरू असलेल्या आंदोलनावर थेट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमावर्ती भागात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे यावरही अमेरिकेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

कुठल्याही प्रकारची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेटचाही वापर केला जातो. यामुळे तो एक चांगल्या लोकशाहीचा भाग आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर बॉर्डरवर येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. या भागात इंटरनेट बॅन आहे. तसेच हरियाणातील काही जिल्ह्यांतही इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.

भारतात मागील दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अमेरिकन पॉप सिंगर रिहानासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी व संस्था, संघटनांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची भाची, लेखिका मीना हॅरीस यांनी कॅपिटॉल हिलमधील हिंसाचार आणि शेतकरी आंदोलनावर सुरू असलेली दडपशाही ही एकाच मानसिकतेतून होत असल्याचे म्हटले आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाचे एक छायाचित्र ट्विट करत मीना हॅरीस यांनी म्हटले की, जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एक महिन्यापूर्वीच हल्ला झाला. त्यानंतर आता जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी निगडीत असल्याचे त्यांनी म्हटले. भारतात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात सुरक्षा दलाकडून होणारी दडपशाही आणि इंटरनेट बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment