राहुल गांधींच्या मिडास टचमुळेच काँग्रेस सरकार पडलं ; भाजपचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्याने अल्पमतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस (Congress) आणि द्रमुक आघाडीचे सरकार अखेर सोमवारी कोसळले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V Narayanasamy) यांना सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे. यावरून आता भाजपाचे नेते आणि आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय (Amit Malviya) यांनी काँग्रेसला बहुमत सिद्ध न करता आल्यानंतर सणसणीत टोला लगावला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. सध्या राहुल गांधी हे पुडुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राहुल यांच्या पायगुणामुळेच काँग्रेसचं सरकार पडल्याचं म्हणत मालवीय यांनी निशाणा साधला आहे. “राहुल गांधी पुद्दुचेरीला गेले आणि त्यांनी त्यांच्या मिडास टचमुळे या केंद्रशासित प्रदेशामधील काँग्रेसचं सरकार पाडलं” असं मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्याच्या घडीला देशातील केवळ पाच राज्यांमध्येच काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड या पाच राज्यांमध्येच काँग्रेस सत्तेत आहे. यापैकी पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येच काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहे. तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस पक्ष हा दुय्यम भूमिकेत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment