फडणवीसांच्या बॅनरमधून अमित शहांचा फोटो गायब; चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- भाजप सरकार आलं असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात काहीच आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. फडणवीस मुख्यमंत्री होणार असताना त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावल्याने भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यातच आज नागपूर येथे फडणवीसांच्या स्वागत बॅनरवर अमित शहा यांच्या फोटो गायब आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्या घरी नागपूरला पोहोचले. यावेळी विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच रोड शो देखील काढण्यात आला. मात्र फडणवीसांच्या स्वागतासाठी आणि रोड शोसाठी लावण्यात आलेल्या बॅनरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता. त्यामुळे चर्चाना उधाण आले. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, याचा फोटो असताना अमित शाह मात्र कुठेच दिसत नव्हते.

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यामागे अमित शहा यांचा हात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे फडणवीस समर्थन नाराज होते. यापूर्वी मुंबई कार्यालयात लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शहा गायब असल्याचे दिसून आले. अमित शाहांसारख्या दिग्गज नेत्याचा फोटो बॅनर करून गायब झाल्याने भाजपमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

 

Leave a Comment