Sunday, March 26, 2023

Big Breaking News | अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

मुंबई | बाॅलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  बच्चन यांना कोरोना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून यासंदर्भात सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

“माझी कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गेल्या 10 दिवसात माझ्याशी ज्या ज्या व्यक्तींनी संपर्क साधलेला आहे, त्या सर्वांनी कृपया त्यांची चाचणी करून घ्यावी ही विनंती!”  असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.